मी चुकीचे काही केलेले नाही… चौकशीत ईडीला पूर्ण सहकार्य करणार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी चुकीचे काही केलेले नाही… चौकशीत ईडीला पूर्ण सहकार्य करणार…

प्रतिनिधी : मुंबई आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावल्यानंतर अखेर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी ईडीसमोर (ED office) चौकशीसाठी हजर राह

माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खा.संजय काका पाटील (Video)
ईडी आमच्यासाठी नवीन नाही – मंत्री अशोक चव्हाण (Video)
आरोपीची अटक ईडीसाठी होणार अवघड  

प्रतिनिधी : मुंबई

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावल्यानंतर अखेर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी ईडीसमोर (ED office) चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला. 

यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. ईडीकडून दोन समन्स बजावण्यात आले, अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावले? हे मला माहीत नाही. 

या चौकशीला माझा पूर्ण सहकार्य असल्याची त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचे शपथ घेऊन मी मागेच सांगितले होते की मी काही चुकीचे केले नसल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. “मला ईडीचे दुसरे समन्स मिळाले आहे. मी चौकशीला जात आहे. 

मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितले आहे की, मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही. 

चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे देणार. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावले आहे, हे मला माहिती नाही. 

माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. हे मला नक्की माहीत आहे. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल.” असे त्यांनी सांगितले.

COMMENTS