कृषी कायदे विरोधात देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी कायदे विरोधात देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद

इगतपुरी /प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जन विरोधी व कार्पोरेट धार्जीने तीन कृषि कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उ

शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजनेचा लाभ घ्यावा – क्षीरसागर
चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद
कराड तालुक्यातील बेलवाडी येथे एकरी 125 टन उसाचे उत्पादन

इगतपुरी /प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या जन विरोधी व कार्पोरेट धार्जीने तीन कृषि कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आमदार हिरामण खोसकर व सीआयटीयुचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली घोटी शहरात मोर्चा काढुन भंडारदरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रविण गोडांळे यांना निवेदन देऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

       या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जन विरोधी व कार्पोरेट धार्जीने तीन कृषि कायदे व चार श्रम संहिता रद्द करा, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करा, संपुर्ण उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव शेतकऱ्यांना मिळेल यासाठी केंद्रीय कायदा करा, संपुर्ण देश कारपोरेट कंपन्यांना विकुण टाकणारे खाजगी करणाची निती बंद करा, डिझेल, पेट्रोल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंचे भाव निम्मे करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा आणि लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा, इगतपुरी नगरपरिषदेतील कमी केलेल्या महिला कामगारांना विनाशर्त कामावर घ्यावे, घोटी टोलफ्लाझा येथे स्थानिक तरूणांना रोजगार देण्यात यावा आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.

          या आंदोलनात काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, जि. प. सदस्य संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, सचिव भास्कर गुंजाळ, बाळासाहेब कुकडे, बाळासाहेब लंगडे, निवृत्ती कातोरे, उत्तम भोसले, बाळासाहेब वालझाडे, कमलाकर नाठे, अरुण गायकर, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश तोकडे, हिरामण कवटे, शेतकरी नेते पांडूरंग शिंदे, किरण कातोरे, संपत काळे, ईश्वर सहाणे, समता परिषदचे शिवा काळे, संतोष सोनवणे, सोमनाथ भोंडवे, सविता पंडित, कैलास घारे, सीटुचे सरचिटणीस देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, मच्छिंद्र गतीर, निवृत्ती कडु, संदीप पागेरे, अरुण भोर, सिमा दिवटे, सुनिल मालुंजकर, रोहिदास टिळे, भाऊसाहेब जाधव, भगवान नाठे, आप्पासाहेब भले, रामदास चारस्कर, जाईबाई घाटाळ, रुंजा वाघ, बबाबाई लहांगे, कमल निकम, संध्या जोशी आदी उपस्थीत होते.

COMMENTS