खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून हाँटेल चालकाचे पलायन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून हाँटेल चालकाचे पलायन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीराहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथिल कंट्रक्शन व्यवसायातील ठेकेदाराने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून गळफास घेवून आत्महत्या क

नगरच्या साईबन शिवारात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार
नेत्रदीपक लढतींनी गाजला कै.विष्णू उस्ताद आखाडा
नात्याला काळिमा…काकाने केला पुतणीचा विनयभंग

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथिल कंट्रक्शन व्यवसायातील ठेकेदाराने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून गळफास घेवून आत्महत्या करण्याची घटना ताजी असताना राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील ताहाराबाद चौकातील परराज्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने खासगी सावकारीला कंटाळून आपल्या कामगारांसह पलायन केले असल्याची माहिती समोर आली आहे.खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून अनेक जण टोकाचे पाऊल उचलीत असल्याच्या घटना समोर येत आहे.
राहुरी फँक्टरी येथिल हॉटेल व्यावसायिक कोरोना काळात लॉगडाऊनमुळे अडचणीत आला असता त्याने राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. सावकारास दरमहा व्याज दिले जात होते.परंतू कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत सापडला आहे.खाजगी सावकार वारंवार तगादा करुन दमबाजी करू लागल्याने वैतागून आपल्या कामगारांसह पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान गेल्या ४ दिवसापूर्वी टाकळीमिया येथील एका ठेकेदाराने खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.हि घटना ताजी असतानाच राहुरी फॅक्टरी येथिल एका हॉटेल व्यवसायिकाने आपले दोन्ही हॉटेल बंद करून कामगारांसह पलायन केल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा खासगी सावकारीला विषय ऐरणीवर आला आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील खासगी सावकारकी रोखण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासनापुढे असून त्याकडे कशा प्रकारे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS