प्रतिनिधी : दिल्ली नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नक्सलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा (Ami
प्रतिनिधी : दिल्ली
नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात नक्सलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बंद खोलीत चर्चा होणार असल्याची चर्चा सुरु होती.
मात्र अमित शहा यांनी मोठी रणनीती आखत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दुपारचे जेवण घेतले. त्यामुळे अमित शहांच्या लंच डिप्लोमेसीमागे कुठला उद्देश असणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
आज झालेल्या बैठीकीनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही बैठक बंद खोलीत झाल्याने शहा -ठाकरेंमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ती राजकीय स्वरुपाची होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
जवळपास १५ मिनटे या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर दुपारचे जेवणही त्यांनी सोबतच घेतले. अमित शहा मुख्यमंत्र्यासोबत भोजनाचा अस्वाद घेत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच नेते आहेत.
अमित शहा, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बसलेले आहेत. शहा यांच्या उजव्या हातालाच लागून उद्धव ठाकरे बसले आहेत.
अमित शहांच्या या लंच डिप्लोमेसीमागे कुठले कारण दडले असणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे या पाच नेत्यांपैकी तिन्ही नेते आजी, माजी सहकारी आहेत.
उद्धव ठाकरे हे अमित शहांचे माजी सहकारी आहेत. तर नितीश कुमार आजी सहकारी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे भावी सहकारी होणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
एकीकडे दिल्लीत अमित शहा-उद्धव ठाकरे दुपारचे जेवण करत होते तर दुसरीकडे त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि खासदार पुण्यात शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह आघाडीतील पक्षांना कडक इशारा दिला.
आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी अजित पवारांना दिला.
COMMENTS