राज्यातील मंदिरे दर्शनास खुली करण्याच्या मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत अॅड. तापकीर यांनी उद्धव ठाकरेंचे पत्राद्वारे केले अभिनंदन
राज्यातील मंदिरे दर्शनास खुली करण्याच्या मुख्यमंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत
अॅड. तापकीर यांनी उद्धव ठाकरेंचे पत्राद्वारे केले अभिनंदन
राज्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट असल्याने धार्मिक स्थळे, मंदिरे देवदर्शनासह इतर धार्मिक कार्यास बंद होती. मात्र सध्या कोरोना महामारीचे संकट कमी झाल्याने धार्मिक कार्यासह देवदर्शनास मंदिरे ७ ऑक्टोबर पासून खुली करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी धाडसी निर्णय घेवून भाविकांच्या श्रद्धा व भावना तसेच मागणीची दखल घेतली. या निर्णयाचे स्वागत श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी केले आहे.
या संदर्भात मंदिरावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी अॅड. तापकीर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली होती. देवस्थानने केलेल्या मागणीची शासनाने दखल घेवून निर्णय घेतल्या बद्दल देवस्थानच्यावतीने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन व आभार अॅड. तापकीर यांनी मानले.
COMMENTS