मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राला फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा, संत परंपरेचा वारसा लाभल्याने पुरोगामी अशी ओळख मिळाली आहे. परंतु, मराठवाड्या
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राला फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा, संत परंपरेचा वारसा लाभल्याने पुरोगामी अशी ओळख मिळाली आहे. परंतु, मराठवाड्यात आजही मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशकतेच्या मूल्यांना तिलांजली दिली जाते.आजही हिंगोलीत शोषित, पीडित, उपेक्षितांना कुत्सित मानसिकतेतून बघितले जाते. समाज बांधवांना मुख्यप्रवाहात आणून शोषितांपासून ‘शासनकर्ती जमात’ बनवण्याचे उद्दिष्ट त्यामुळे बहुजन समाज पार्टीचे आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी हिंगोलीत केले. संवाद यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना त्यांनी भाजप तसेच महाविकास आघाडीच्या शोषित, पीडित विरोधातील मानसिकतेवर टीकास्त्र चढवले.
देशाला सामाजिक क्रांतीची दिशा देणाऱ्या पुरोगामी, पुढारलेल्या महाराष्ट्रात पीडित, शोषित, उपेक्षितांची आजही अवहेलना होते. भाजप, महाविकास आघाडी सरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या राजकीय पक्षांकडून उपेक्षितांचा वापर केला जातो, असा आरोप अँड.ताजने यांनी केला. राज्यात २०१७ पासुन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वरील अत्याचारात वाढ झाली आहे.अँट्रॉसिटीच्या प्रमाणात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे, अशी संतप्त भावना देखील त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात मोठी सामाजिक क्रांती घडून आली आहे. असे असतानांही राज्यात मोठ्या प्रमाणात एससी, एसटी यांच्यावरील अत्याचारात वाढ होण्यास राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे अँड.ताजने म्हणाले.
अशात राज्यकर्त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. उपेक्षितांविरोधात होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराचा जाब बसपा विचारणार आहे. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप हे आरक्षण तसेच शोषित, पीडितांविरोधी मानसिकतेचे आहे. त्यांना आगामी निवडणुकांमध्ये अद्दल घडवा, असे आवाहन अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केले. कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव दिगंबरराव ढोले, प्रदेश सचिव देवराव भगत, अविनाश वानखडे, प्रदेश कार्यालयीन सचिव प्रा.डॉ.अभिजित मनवर, जेष्ठ नेते रमेश भैय्या भिसे-पाटील, राहुल कोकरे, गोविंदराव भगत, मनिष कावळे, बबनराव बनसोड, जिल्हा अध्यक्ष प्रज्ञावंत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश दिपके, कोषाध्यक्ष वसंत पाईकराव, महासचिव राजेश जोंधळे, अनिल वाढवे, परमेश्वर लोखंडे तसेच जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS