दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद

Homeताज्या बातम्याशहरं

दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेली कर्जत तालुक्यातील गावे राहणार ८ दिवसांसाठी बंद

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदा

Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)
देशात 9 हजार 355 नवे कोरोना रूग्ण
साडेपाच महिन्यात होणार कोरोनाचा नायनाट? निमगाव वाघाच्या होईकात भाकित

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे व सहाय्यक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांनी विविध गावांमध्ये बैठका घेतल्या. दुरगाव, बेलगाव, खांडवी, टाकळी खंडेश्वरी या गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्तरीय कोव्हिड प्रतिबंधक समिती सदस्यांची बैठका घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण संख्या असलेल्या गावात कोव्हिड अनुरुप वर्तन तसेच कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाय योजनांची सक्त अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीतून सूचना देण्यात आल्या. ग्रामस्तरीय कोव्हिड प्रतिबंधक समिती अध्यक्ष सरपंच, सदस्य सचिव तलाठी, सहाय्यक सदस्य सचिव ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत अधिकाऱ्यांनी पुढील सूचना दिल्या. गावनिहाय रुग्ण सहवासीतांचा शोध घेणे कामी प्रति एक पॉझिटिव्ह रुग्णामागे पंचेचाळीस सहवासीतांचा शोध घेणे व संबंधितांच्या चाचण्या करून घेणे. कोणत्याही परिस्थितीत सक्रिय रूग्णाच्या सहवासात आलेला व्यक्ती टेस्टिंग केल्याशिवाय राहणार नाही. कोणताही सक्रिय रुग्ण कोणत्याही परिस्थितीत गाव पातळीवर किंवा गृह विलगीकरणात राहणार नाही. पॉझिटिव्ह सापडलेला प्रत्येक रुग्ण हा कोव्हिड केअर सेंटर येथे दाखल होईल याची दक्षता ग्रामस्तरीय समितीने व नियुक्त जबाबदार तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी घेणे. दहापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या गावात ग्रामस्थांच्या सहभागाने ग्रामपंचायतीने ती गावे किमान आठ दिवस बंद ठेवणे. 

जी गावे आठ दिवसांसाठी बंद होणार आहेत, त्या ठिकाणी गावातील कोणताही व्यक्ती हा गावाबाहेर जाणार नाही व गावाबाहेरील कोणत्याही व्यक्ती गावात प्रवेश करू शकणार नाही. गाव पातळीवर लसीकरण शिल्लक असलेल्या नागरिकांची यादी करणे व त्याप्रमाणे जास्तीत जास्त संख्येने लसीकरण शिबिर गावात आयोजित करून जास्त प्रादुर्भाव असलेल्या गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण करून घेणे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या दुरगाव – २५, राशिन – २३, कर्जत – १८ खांडवी – १२, बेलगाव – १२ टाकळी खंडेश्वरी – ११ अशी आहे. गाव बंदच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दुरगाव ग्रामपंचायतीने गाव पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

COMMENTS