Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)

पाटोदा नगरपंचायत अंतर्गत रामकृष्ण नगर, वाॅर्ड क्रमांक ६ मधिल नागरीकांना रस्ते, विज, पाणी उपलब्ध करून देण्यास ३५ वर्षापासून नगर पंचायत अपयशी ठरली आहे.

रस्त्यांच्या कामाची नियमबाह्य देयके दिली कशी? धनंजय मुंडे कुणाला वाचवताय…? (Video)
Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)

पाटोदा नगरपंचायत अंतर्गत रामकृष्ण नगर, वाॅर्ड क्रमांक ६ मधिल नागरीकांना रस्ते, विज, पाणी उपलब्ध करून देण्यास ३५ वर्षापासून नगर पंचायत अपयशी ठरली आहे. त्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे,

लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

रामकृष्ण नगर, वाॅर्ड क्रमांक ६ येथील लोकसंख्या अंदाजे  २ ते अडीच हजार आहे. निवेदन, आंदोलन करून सुद्धा नगर पंचायतीने रस्ते, विज, पाणी मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. पावसाळ्यात नागरीकांना खड्डे असलेल्या चिखलमय रस्त्यावरून जाताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

यापूर्वी याबाबत आंदोलन करण्यात आले होते तरीही त्यात फरक पडला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलनात वैशाली गीते, सतीश गर्जे, प्रितम सरवदे, हरीकृष्ण गीते, आशा पालवे, शहाबाई सिरसाट, कला मुंजाळ, शयरा शेख, ज्योती सानप, वैशाली जाधव, मंगल गायकवाड आदी सहभागी झाले होते.

COMMENTS