प्रतिनिधी : अहमदनगरजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा समोर, अहमदनगर या कार
प्रतिनिधी : अहमदनगर
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा समोर, अहमदनगर या कार्यालयामार्फत दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत पंडीत दीनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्हयातीली सुशिक्षित बेराजगार उमेदवार ज्यांनी https://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलवर (नावनोंदणी केली नसेल त्यांनी नावनोंदणी करुन) व्हॅकन्सीला अप्लाय करावा व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ऑनलाईन अप्लायसाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर भेट द्या व jop seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड ने Sign in करा.
आपल्या होम पेजवर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा Ahmednagar Online Jop Fair 4 हा पर्याय निवडा. Ahmednagar जिल्हा निवडा. दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणा-या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा.
I agree हा पर्याय निवडा. आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करुन Apply बटनावर क्लिक करा. मुलाखती ह्या ऑनलाईन पध्दतीने जसे व्हॉटसॲप कॉलिंग, स्काईप, किंवा टेलिफोन वरुन घेतले जातील.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा समोर, अहमदनगर तसेच 0241-2425566 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
COMMENTS