अमेरिकेतही मोदी, मोदीचा जयघोष… चाहत्यांनी केले जोरदार स्वागत

Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेतही मोदी, मोदीचा जयघोष… चाहत्यांनी केले जोरदार स्वागत

वेब टीम : वॉशिंग्टन जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. आतापर्यंत बायडेन आणि मोदी यांची तीन वेळा ऑनलाइन चर्चा

भाजप सरकारकडून सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो…पृथ्वीराज चव्हाणांच टीकास्र (Video)
अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले
मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

वेब टीम : वॉशिंग्टन

जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे. आतापर्यंत बायडेन आणि मोदी यांची तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे. 

भेट पहिल्यांदाच होणार आहे. या भेटीत अफगाणिस्तान व तालिबान या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत ते वॉशिंग्टन येथे पोहचले तेव्हा पाऊस सुरू होता. 

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंह संधू यांच्यासह भारतीय वंशाचे नागरिकही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 

मोदींचे आगमन होताच, नागरिकांच्या स्वागताच्या घोषणा दिल्या. मोदींनी गाडीतून उतरले, लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे अभिवादन स्वीकारले.

या दौऱ्यात मोदी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचीही भेट घेणार आहेत. 

कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या आहेत. अमेरिकेत दाखल होताच मोदी थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंट येथे गेलेत.

अफगाणिस्तानातील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेला भेट देऊन 

तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम केला होता. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात २४ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. ते भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. 

दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भातही चर्चा होऊ शकते. 

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असतील.

COMMENTS