जागतिक पातळीवर भारताचा डंका

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जागतिक पातळीवर भारताचा डंका

गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सहन करावा लागत आहे. त्यातच अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटातून सावरत असून, जागतिक पा

मदत करत असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तालिबानी अतिरेकी झाले आक्रमक… झेंडा फाडला
अफगाणिस्थानात होणार क्रिकेट मालिका… ‘हा’ संघ दौरा करण्याची शक्यता
पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.

गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सहन करावा लागत आहे. त्यातच अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या संकटातून सावरत असून, जागतिक पातळीवर आपले राजनैतिक धोरण राबवत आहे. यात भारताचा डंका जागतिक पातळीवर उमटत आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर दहशतवाद वाढत चालला आहे. पाकिस्तान व तालिबानी संघटनांमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर दोन देशांनी पाकिस्तानमध्ये होणार्‍या सामान्याला आपला संघ न पाठविण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराने जागतिक पातळीवर पाकिस्तानमध्ये असलेल्या असुक्षिततेच्या वातावरणाबाबत उलट-सुलट चर्चा झाल्या. तसेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमानाने होणारा अमेरिका दौरा अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीतून न जाता पाकिस्तानच्या हवाई नेण्यास पाकिस्तान सरकारने परवानगी दिली. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून आलेल्या दबावामुळे हे शक्य झाले. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी भारतीय बनावटीच्या कोविशील्ड ही लस घेतलेल्या लोकांना क्वारंटाइन प्रक्रियेला सामोर जावे लागणार आहे. त्यास ब्रिटन सरकारने मंजूरी देताना लसीबाबत शंका घेतली नाही.

मात्र लस घेतलेल्या प्रमाणपत्रावर शंका घेतली आहे. कोरोनामुळे झालेल्या चढ-उताराचे परिणाम चिनमधील रियल इस्टेलच्या व्यवसायावर झाला आहे. सुमारे 300 कंपन्यांनी घेतलेली कर्जे थकल्याने जॉर्ज सोरोस या अमेरिकास्थित उद्योगपतीने बांधकाम कंपन्यांच्या दिवाळखोरीने चीनची अर्थव्यवस्था कोसळेल, असे भाकीत केले आहे. ज्या अमेरिकी उद्योगपतीने सन 1992 मध्ये बँक ऑफ इंग्लंडला घाम फोडला. त्या सोरोस यांनी नुकतेच चीनमधील बांधकाम क्षेत्र, तेथील कंपन्या आणि त्यांची कर्जाची प्रचंड थकबाकी बघता मोठी चिंता व्यक्त केली आहे. भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे कामगारांच्या हाताला काम न मिळाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली होती. मात्र, अनलॉक होताच सर्व व्यवसाय हळू-हळू पूर्व पदावर येवू लागले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत मंदीचे सावट आले नाही.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा स्थितीत आखाती देशात मात्र आग-डोंब सुरु होता. अफगाणिस्तानमध्ये अफगान सरकार विरोधात तालीबाने युध्द सुरु ठेवले होते. त्याचा अखेर म्हणजे अफगाणिस्तान सरकारच्या पदाधिकार्‍यांना आपल्या निवडक लोकांसोबत देश सोडून आश्रयासाठी दुसर्‍या देशात जावे लागले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये तालीबानसोबत हातमिळवणी करून काश्मिर पाकिस्तानचाच हिस्सा असून त्यासाठी काहीही सहकार्य करण्याबाबत चर्चा सुरु केल्या होत्या. याचा परिणाम जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्याचाच परिपाक म्हणून होणार्‍या क्रिकेटच्या सामन्यातून दोन देशांनी आपले संघ पाठविण्याबाबत असमर्थतता दाखविली. त्यानंतर पाकिस्तानकडून ओसमा बिन लादेन, दाऊद इब्राहिम यासारख्या लोकांना पाकिस्तानची भूमि सुरक्षित वाटत असल्याने ते आमच्या देशात येवू राहिले असल्याची वाच्यता केली. अशा स्थितीत भारताकडे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्षपद आले. त्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा निश्‍चित झाला. हा दौरा आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप महत्वाचा मानला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष या नात्याने जगभरातून मोदींच्या दौर्‍याला महत्वाचे मानले जावू लागले आहे. या भारत-अमेरिका हा हवाई मार्ग अफगाणिस्थान हवाई हद्दीतून जात असल्याने या मार्गाने विमान प्रवास करणे धोकादायक मानले जात होते. अशा स्थितीत पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढू लागला होता. त्यामुळे पाकिस्तान सरकारने मोदींना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमान प्रवास करण्यास मान्यता दिली. त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेला जाताना मोदींचे विमान अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर प्रतिबंध लादला होता. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय नागरी उड्डान संघटनेमध्ये याचा कडक निषेध व्यक्त करत आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन असल्याचा आरोप देखील भारताने लावला होता.

भारतात कोविशील्ड लशीचे दोन डोस घेतलेल्यांना ब्रिटनने प्रवासाला परवानगी दिली आहे. ब्रिटनने सुरुवातीला कोविशील्डच्या लशीला मान्यता दिली नव्हती. त्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर ब्रिटनने माघार घेतली. कोरोनाच्या साथीनंतर चीनमधील बांधकाम क्षेत्रातील सुमारे 300 कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत. चीनमधील बांधकाम क्षेत्रातील एव्हरग्रान्ड या सर्वात मोठ्या कंपनीचे 300 अब्ज डॉलरचे कर्ज थकले आहे. गुंतवणूकदार ताबा घेण्यासाठी, सदनिका बांधून कधी पूर्ण होईल या विवंचनेत आहेत. या कंपनीला यातून बाहेर काढण्यासाठी चीन सरकारने 14 अब्ज डॉलरद्वारे मदतीचा हात पुढे केला. मात्र, ही रक्कम त्यासाठी तुटपुंजी आहे. जॉर्ज सोरोस या अमेरिकेच्या उद्योगपतीने बांधकाम कंपन्यांच्या दिवाळखोरीने चीनची अर्थव्यवस्था कोसळेल, असे भाकीत केले आहे. ज्या अमेरिकी उद्योगपतीने 1992 मध्ये बँक ऑफ इंग्लंडला घाम फोडला, त्या सोरोस यांनी नुकतेच चीनमधील बांधकाम क्षेत्र, तेथील कंपन्या आणि त्यांची कर्जाची प्रचंड थकबाकी बघता मोठी चिंता व्यक्त केली आहे.

COMMENTS