मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक… म्हणाले, भगवा ध्वज सामर्थ्य, बलिदानाचे प्रतीक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक… म्हणाले, भगवा ध्वज सामर्थ्य, बलिदानाचे प्रतीक

प्रतिनिधी : अहमदनगरराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार यांची संकल्पना आणि आय

भाजपचे हिंदूत्व गोमूत्रधारी – उद्धव ठाकरेंची टीका
Alandi : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा धाडसी निर्णय – अ‍ॅड.तापकीर
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

प्रतिनिधी : अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. स्थानिकांसह राजकीय वर्तुळातही स्वराज्य ध्वजाविषयी उत्सुकता आहे. महाराष्ट्राची वीररसाने भरलेली गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या हिंदवी स्वराज्याची निश्चयी शौर्य परंपरा यांचा पुन्हा एकदा आठव करत देशभरात हा स्वराज्य धर्माचा जागर घेऊन निघालेली स्वराज्य ध्वज यात्रा निश्चितच महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.

या प्रेरणेने भारलेल्या प्रवासाचं आणि ध्येयाचं कौतुक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्र पाठवून केलं आहे. मराठी मातीचा अभिमान असणारा हा स्वराज्य ध्वज युवा वर्गाला प्रगती व त्यागाची प्रेरणा देईल. राज्यात तसेच देशात होणा-या ध्वज पूजन व प्रवासाच्या माध्यमातून देशभरातील जनतेचा आशिर्वाद आणि शुभेच्छा या उपक्रमाला मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी गौरवोद्गार काढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण किल्ल्यावर देशातील सर्वात मोठा उंच भगवा ध्वज उभारण्यात येतोय ही आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

युवा आमदार रोहित पवार यांची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदवी स्वराज्याची ओळख असणारा भगवा ध्वज हा सामर्थ्याचा, बलिदानाचे प्रतिक आहे. १५ आँक्टोबर रोजी खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावर होणा-या स्वराज्य ध्वज उभारणीच्या सोहळ्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आज चौदाव्या दिवसाचा प्रवास सुरू असलेला स्वराज्य ध्वज हा तळागाळातून अनेक जिल्हा, शहरे, गावांमधून अडचणींची पर्वा न करता पोहोचून यशाची व कौतुकाची पावती मिळवत आहे.

अवघ्या तेरा दिवसांमध्ये स्वराज्य ध्वजाने महाराष्ट्रातील एकवीस जिल्हे आणि बिहार, उत्तर प्रदेश अशा दोन राज्यांपर्यंत प्रवास केला आहे. सुमारे दोन आठवडे उलटूनही कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ध्वज मोहिमेचा महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू आहे. स्वराज्य ध्वजाने आतापर्यंत एकवीस जिल्ह्यांना भेट दिली आहे. या सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला उत्स्फूर्त स्वागत केले गेले आहे.

COMMENTS