नक्षल्यांवर दया-माया नको… सडेतोड उत्तर देण्याचे मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्षल्यांवर दया-माया नको… सडेतोड उत्तर देण्याचे मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

प्रतिनिधी : मुंबई नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची धक्कादाय

विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही
‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रक्ताने रेखाटलेले चित्र .

प्रतिनिधी : मुंबई

नुकतेच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. 

नक्षलवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे . या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी तडकाफडकी बैठकीचे आयोजन केले .

या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे .

तसेच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावाही शिंदे यांनी घेतला . नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना धडा शिकवा . असेही एकनाथ शिंदे संबंधित अधिकाऱ्यांना म्हणाले .

COMMENTS