Homeताज्या बातम्या

PM मोदींवर वक्तव्य करणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनामा व्हायरल! दबावाचा आरोप; जंतर-मंतर प्रकरणाला नवं वळण

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातील एका विद्यार्थिनीचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईब

भारत-ब्राझील व्यापाराला नवी गती
भारत-कॅनडा व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल : पंतप्रधान मोदी
जागतिक पातळीवर भारताचा डंका
मुझसे बड़ी गलती हुई, देश माफ करे', पीएम मोदी को अपशब्द कहने वाली छात्रा का  माफीनामे वाला वीडियो वायरल - ruchika singh apology video jantar mantar cjp  protest pm narendra ...

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनातील एका विद्यार्थिनीचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या 15 वर्षीय मुलीवर आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये ही विद्यार्थिनी हात जोडून देशाची माफी मागताना दिसत असून, मित्रांसोबत आंदोलनात गेल्यानंतर इतरांच्या चिथावणीला बळी पडल्याचे ती सांगत आहे. “माझ्याकडून चूक झाली, मला याची लाज वाटते,” असे म्हणत तिने माफी मागितली आहे.दरम्यान, हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याचे वक्तव्य केल्यानंतर समोर आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी विद्यार्थिनीवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल केला असून, आंदोलन आयोजकांकडूनही कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

COMMENTS