मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी ज्या भागात घडलो तेथे माझा सन्मान होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे -: डॉ.गणेश चंदनशिवे

https://www.youtube.com/watch?v=2-R9qsJl5J4 बीड : प्रतिनिधीमाझी कर्मभूमी मुंबई जरी असली तरी मी घडलो बीड जिल्हयात. गेवराई तर माझं आदर्शाचं घर

Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)
बीड : लिंबागणेश येथिल आठवडी बाजारास भरघोस प्रतिसाद (Video)
Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)

बीड : प्रतिनिधी
माझी कर्मभूमी मुंबई जरी असली तरी मी घडलो बीड जिल्हयात. गेवराई तर माझं आदर्शाचं घर. त्यामुळे गेवराईकर लोककलावंतांनी केलेला सन्मान अभिमानास्पद असून तो अविस्मरणीय राहील, असे भावोद्गार लोककलेचे अभ्यासक,पार्श्वगायक,लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे यांनी काढले.

महाराष्ट्र शासनाच्या लोककला अनुदान समितीचे सदस्य तथा शाहीर विलासबापू सोनवणे यांच्या निवासस्थानी डॉ.गणेश चंदनशिवे यांच्या सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जेष्ठ कलावंत अॅड. सुभाष निकम, राजेंद्र बरकसे, प्रशांत रुईकर, विष्णुप्रसाद खेत्रे, गौरी चंदनशिवे आदी उपस्थित होते.

COMMENTS