Homeताज्या बातम्या

आष्टी येथील बी. फार्मसी व एम फार्मसी कॉलेजचा विद्यापीठ परीक्षेत सरासरी 98% निकालडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजीनगर फार्मसी विभागाचा निकाल जाहीर

आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी(डी फार्मसी ।बी फार्मसी ।एम फार्मसी) येथील बी. फार्मसी व एम फार्मसी अभ्

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे व अपुर्वा सामंत बिनविरोध
हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “खेल उत्सव 2024” चे आयोजन



आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी(डी फार्मसी ।बी फार्मसी ।एम फार्मसी) येथील बी. फार्मसी व एम फार्मसी अभ्यासक्रमाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या एप्रिल-मे 2026 सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाने 98 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरील निकाल माहितीनुसार ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमासह शिक्षकांच्या मार्गदर्शना मुळे यश संपादन झाले.
प्रथम वर्ष बी फार्मसी (द्वितीय सत्र) मध्ये ऋतुजा अनारसे (78.62%) प्रथम, प्रतीक्षा पवार (77.38%) द्वितीय, पायल गर्जे (77.24%) तृतीय, सुप्रिया ढाकणे (77.10%) चतुर्थ आणि समिक्षा धनावडे (76.83%) यांनी पाचवा क्रमांक मिळविला. द्वितीय वर्ष बी फार्मसी (चतुर्थ सत्र) मध्ये गायत्री पवार (77.43%) प्रथम, सत्यम आजबे (75.70%) द्वितीय, निलम पवार (75.00%) तृतीय, संचिता बोडखे (74.86%) चतुर्थ आणि तेजल शिंदे (74.43%) पाचव्या क्रमांकावर राहिल्या. तृतीय वर्ष बी फार्मसी (सहावे सत्र) मध्ये पल्लवी झगडे (78.27%) प्रथम, अनुराधा मसाळ (78.13%) द्वितीय, जागृती नागरगोजे (77.07%) तृतीय, अंशा शेख (76.27%) चतुर्थ आणि स्नेहल जमदाडे (75.60%) पाचवा यांनी यश संपादन केले. अंतिम वर्ष बी फार्मसी (आठवे सत्र) मध्ये वैष्णवी लिमकर व अश्लेषा दहिफळे (प्रत्येकी 81.45%) यांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर मुजम्मिल पठाण (80.55%)द्वितीय , निकिता होळकर (80.36%)  तृतीय आणि रुशीकेश खाडे (79.03%)  चतुर्थ क्रमांकावर राहिले. एम फार्मसी मधील प्रथम वर्ष (द्वितीय सत्र) मध्ये घोडके राजश्री (72.00%) प्रथम, लटपटे मनीषा (71.54%) द्वितीय, पवार रोहित आणि धोंडे अपेक्षा (69.69%) संयुक्त रित्या तृतीय क्रमांकावर राहिले. सन 2006 मध्ये संस्थापक अध्यक्ष मा. भीमरावजी धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या फार्मसी कॉलेजने ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.  या फार्मसी कॉलेजमध्ये मध्ये नियमित अध्यापन, प्रात्यक्षिके, सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, औषधनिर्मिती कंपन्यांना शैक्षणिक भेटी, संशोधनाला प्रोत्साहन, संशोधन सादरीकरण, शिक्षक-पालक मेळावा, कॅम्पस इंटरव्ह्यू, सामाजिक उपक्रम तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत करून दिल्या जातात. कॉलेजमधील या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मा. भीमरावजी धोंडे, सहसचिव डॉ. अजयदादा धोंडे, संचालक अभयराजे धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, श्री. शिवदास विधाते, श्री. माऊली बोडखे, श्री. संजय शेंडे,  श्री. संदीप नन्नवरे ,श्री. सागर वाघुले, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बी.फार्मसी व एम फार्मसी कॉलेजचा यशामागे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन हे महत्त्वाचे घटक असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS