सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…

Homeमहाराष्ट्रशहरं

सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…

प्रतिनिधी : नगरमुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर भाजपा आमदार राधाकृष्ण

घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार-
देवेंद्र फडणवीसांनंतर आता या भाजप मंत्र्यांनी दिला ‘मी पुन्हा येईन’ चा नारा
भाजपा तर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी : नगर
मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर भाजपा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

काल औरंगाबादेतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर भाजपा नेत्यांनी युतीचे संकेत दिले. “राजकारणात काहीही होऊ शकते.

राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कुणाचा मित्रही नसतो. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो. महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे, त्याला काही वैचारिक आधार नाही.

सत्तेसाठी हे लोक एकत्र आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचे स्वागतच केले पाहीजे.” असे विधान करून विखे-पाटील यांनी युतीच्या चर्चांना बळ दिले आहे.

COMMENTS