Oplus_16908288 दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील कॅनॉल रोडवरील लोकनेते विनायकरा

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील कॅनॉल रोडवरील लोकनेते विनायकराव मेटे स्मृतीस्थळी सामुदायिक अभिवादन कार्यक्रम पार पडला.
यावेळी विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मराठा समाजाच्या न्यायहक्कांसाठी दिलेल्या योगदानाचा उपस्थितांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या अभिवादन कार्यक्रमास शिवसंग्राम अध्यक्ष डॉ ज्योती मेटे, शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, अशोक हिंगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिरम, नारायणराव काशीद, अनिल घुमरे, उ- बी.बी. जाधव, संजय पवार , नारायणराव थोरात पत्रकार संतोष मानुरकर , वैभव स्वामी, बालाजी मारगुडे, के. के. वडमारे आदी सह त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते, कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. संपूर्ण परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बीड सह विविध जिल्ह्यातही विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

COMMENTS