उत्तर प्रदेशच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच तेथील राजकीय घडामोडीही वाढण्यास सुरुवात झालीय. तसेच निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षा
उत्तर प्रदेशच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच तेथील राजकीय घडामोडीही वाढण्यास सुरुवात झालीय. तसेच निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. त्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला महत्वाचा सल्ला दिला आहे.
आरपीआय 26 सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार असून जवळपास 75 जिल्ह्यांना भेट देणार असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. ते गोरखपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
भाजपने आरपीयआसोबत मिळून निवडणूक लढली पाहिजे. तसेच भाजपने आरपीआयला 10 ते 12 जागा दिल्या पाहिजेत, असं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे. मी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून भाजपने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल, असंही आठवले म्हणालेत.
दरम्यान, आठवलेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळाचं कौतुक करत त्यांच्या कार्यकाळात गुंडराज संपल्याचं म्हटलंय. त्यांनी सर्व विभागांच्या हिताचं काम केलं. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. त्यांच्या सरकारने या वर्गासाठी खूप काही केलं आहे, असं आठवले म्हणालेत.
COMMENTS