पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग

पुणे: शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एक

प्लास्टिकचा कचरा उघड्यावर फेकणार्‍याविरोधात कारवाई करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवतायत
तारुण्यात ज्ञानसमृद्ध, परोपकारी व नीतिमान व्हावे ः किशोर काळोखे

पुणे: शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून या कंपनीत वाढदिवसाचे डेकोरेशन व पार्टी पॉप फटाके बनविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीत असणाऱ्या काही केमिकलमुळे याठिकाणी सिलेंडर स्फोटासारखे आवाज होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुणे व पीएमआरडीए अग्नीशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. कंपनीच्या बाहेर बघ्यांनी देखील मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या धुराचे लोट लांबवर पसरल्याने परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

COMMENTS