तर मला सामनाचा राजीनामा द्यावा लागेल – संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तर मला सामनाचा राजीनामा द्यावा लागेल – संजय राऊत

राजकारणातील चालू घडामोडींबद्दल राऊत हे रोखठोक वक्तव्य करत असतात. असंच एक वक्तव्य राऊत यांनी आता केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जयपुरम

… तर, केंद्राची माघार अटळ ठरेल !
७६ व्या स्वातंत्रदिनानिमित्त राष्ट्रवादी भवनात ध्वजारोहण उत्साहात साजरा
’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ

राजकारणातील चालू घडामोडींबद्दल राऊत हे रोखठोक वक्तव्य करत असतात. असंच एक वक्तव्य राऊत यांनी आता केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जयपुरमध्ये आमदार आणि मंत्री यांच्या राजकीय दुख: बद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, मला मंत्री व्हायची हौस नाही. मी खासदार सुद्धा मनात नसताना झालो. आता मंत्री व्हायचं म्हणलं तर मला सामनाचं काम सोडावं लागेल, असं राऊत म्हणाले.

सामनातून सतत राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडींबद्दल लिहिलं जातं. संजय राऊत सध्या सामनाद्वारे आपल्या विरोधकांना लक्ष करताना पहायला मिळत असतात. राऊत यांनी यावेळी त्यांच्या आणि राहूल गांधी यांच्यातील मैत्रीबद्दल सुद्धा आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या जयपूरमधील आमदार आणि खासदार यांच्या बद्दलच्या वक्तव्याने राजकारणात विविध चर्चा रंगल्या आहेत. नितीन गडकरी हे अगदी स्पष्ट बोलतात, असंही राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS