Homeताज्या बातम्याअहमदनगर

‘बैल गेला आणि झोपा केला’ आता पंचनामे करून उपयोग काय ? सरसकट  मदत द्या – दादासाहेब खेडकर

 खरवंडी कासार प्रतिनिधी शेतकऱ्याचे नुकसान होऊन आठ दिवस झाले आता तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतीमध्ये किती नुकसान झाले असे कळणार संतप्त सवाल जिल्

जम्प रोप स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणीः संदीप कोयटे
सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना जनता धडा शिकवते ः खासदार लंके
बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन

 खरवंडी कासार प्रतिनिधी 
शेतकऱ्याचे नुकसान होऊन आठ दिवस झाले आता तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतीमध्ये किती नुकसान झाले असे कळणार संतप्त सवाल जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस दादासाहेब खेडकर यांनी केला आहे  
खरवंडी कासार परिसरामध्ये भालगाव खरवंडी कासार भारजवाडी मुंगूसवाडे जवळवाडी  मुगुंसवाडे या अनेक गावात सतत तीन दिवस पाऊस पडत होता पाऊस पडून आठ दिवस झाले , परंतु शासनाकडून कडून सरसकट अनुदान न देता आठ दिवसानी पंचनामे करायला सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले दिसून येत नाही शेतीतील  पिके नाहीसे झाले आहेत त्यामुळे आता शेतीमालाचे नुकसान कोठे दिसणार आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी बैल गेला झोपा केला अशी परिस्थिती  झाली आहे   त्यामुळे शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर सरसकट पंचनामे करा ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळी अधिकाऱ्याचे पाय चिखलात जातील म्हणून अधिकारी पंचनामे करण्यास उशीर केला त्यामुळे शेतकऱ्याचा  शेतमाल शेतातून उपटून फेकून दिला आहे आता पंचनामे कशाचे करता असा सवाल युवक काँग्रेसचे सरचिटणीस दादासाहेब खेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे जर सरसकट शेतकऱ्याला मदत नाही केली तर आम्ही या खरवंडी कासार मध्ये मोठं आंदोलन उभारू आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आव्हान युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब खेडकर यांनी केले आहे

COMMENTS