Homeताज्या बातम्यादेश

देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत

इंडियन नर्सिंग काऊंसिंलद्वारे देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत नर्सिंगला महत्वाचं स्थान आहे. कोरोना

लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या वाजणार
अखेर 73 वर्षांनंतर फुकेवाडी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार
मुळा धरणाचे पाणी नगरला देण्यास विरोध ः खंडागळे

इंडियन नर्सिंग काऊंसिंलद्वारे देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत नर्सिंगला महत्वाचं स्थान आहे. कोरोना महामारीने देशातील सर्व आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. परिणामी नर्सिंग व्यवस्था सुधारणा गरजेचं असल्याचं मत आएनसीने व्यक्त केलं आहे. देशातील एमबीबीएस शिक्षणाच्या समतुल्य शिक्षण आता नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मेडिकल एथिक्स म्हणजेच वैद्यकीय नैतिकता या विषयाचं शिक्षण देण्यात येणार आहे. याचा उद्देश हाच आहे की, देशातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. फॉरेंसिक नर्सिंग या संशोधनात्मक विषय सुद्धा आता विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. फक्त 12 वी विज्ञान शाखा असलेल्याच विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, देशातील सर्व बीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधीक सक्षम करण्याचा आमचा मानस असल्याचं मतं आयएनसीचे प्राध्यापक राॅय के जाॅर्ज यांनी व्यक्त केलं आहे. प्रॅक्टीकल पेपर पेक्षा लिखीत पेपर घेण्यावर आएनसी भर देणार असल्याचं जाहीर करण्यात येणार आहे.

COMMENTS