राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा l LokNews24
भिंगार कॅम्प पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
परळीत करुणा शर्मा यांच्याविरोधात कटकारस्थान… माजी मंत्री राम शिंदेंचा आरोप


मुंबई/प्रतिनिधी : राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर
2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने
15 ऑक्टोबर 2021 पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी
संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत
सर्वसहमतीने घेण्यात आला.
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्‍चित करण्यासाठी साखर
आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या
अभ्यासगटाने आपला अहवाल आज शासनास सादर केला असून, त्यावर सहकार विभागाने
हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत,
अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी
साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी असेही
बैठकीत निश्‍चित करण्यात आले. जे कारखाने शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम
वेळेत आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात
गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकर्‍यांनी ठरवावे, यासंबंधीच्या
मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही बैठकीत निश्‍चित
करण्यात आले. राज्यातील 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम
शेतकर्‍यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर, ज्या
कारखान्यांनी शेतकर्‍यांची एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना पूर्णत्वाने दिली
ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय
घेण्यात आला. बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट
शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी, असेही निर्देशही बैठकीत देण्यात
आले.

COMMENTS