तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे

कर्जत : प्रतिनिधी अंबालिका साखर कारखान्याने सभासद असलेल्या कर्जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य द्यावे, वाहनांचे करार कर्जत

प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी
कर्जतचे भूमिपुत्र हवालदार हिंमत जाधव यांचे अकाली निधन
डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा वितरणाचा कर्जत तालुक्यात शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी

अंबालिका साखर कारखान्याने सभासद असलेल्या कर्जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य द्यावे, वाहनांचे करार कर्जत तालुक्यातीलच करावेत, एफआरपी एकरकमी द्यावी या मागण्यांचा विचार केला नाही. तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास आगामी गळीत हंगामात अंबालिका साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी दिला आहे.

अंबालिका साखर कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांचा ऊसाची तोड न करता बाहेरील ऊसाला प्राधान्य देतात, यामुळे कर्जत तालुक्यातील ऊस तसाच शिल्लक राहतो, यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो, ऊसाचे वजन वाढते, ऊस तोडी साठी चकरा माराव्या लागतात, यामुळे पुढील गळीत हंगामात कर्जत तालुक्यातील ऊसाची तोड प्रथम करावी, ऊस वाहतुकीसाठी जे वाहनांचे करार केले जाणार आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील वाहन चालकांना प्राधान्य देण्यात यावे, बाहेरच्या वाहनांना कर्जत तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही.

एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून त्याविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे. ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ मिस्डकॉल मोहिम राबवण्यात येत आहे. 8448183751 या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे. या निर्णयानुसार ६० टक्के रक्कम ऊस तुटल्यानंतर १५ दिवस ते १ महिन्यात, २० टक्के सिझन संपल्यावर व उर्वरीत २० टक्के पुढील सिझन सुरू झाल्यावर आपल्याला बिल मिळणार आहे.

COMMENTS