Homeताज्या बातम्याअहमदनगर

फक्त पावसावर विसंबून असलेल्या शेतीचे शेतकऱ्यांने केले नंदनवन. वर्षाकाठी काढले ५० लाखाचे उत्पन्न.

मिरजगाव (वार्ताहर) सुनिल कांबळेकर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथील नोकरदार शेतकऱ्यांनी नोकरी व शेतीची सांगड घालत पाण्याचे स्त्रोत नसतांना माळरानाचे के

कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल
आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

मिरजगाव (वार्ताहर) सुनिल कांबळे
कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथील नोकरदार शेतकऱ्यांनी नोकरी व शेतीची सांगड घालत पाण्याचे स्त्रोत नसतांना माळरानाचे केले नंदनवन .
कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिकन्या प्रितम बापू शिंगाडे ही कृती द्वारे शेती विषयावर चर्चा करण्यासाठी आली कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथे आली असता येथील नोकरदार राजेंद्र शिंगाडे यांनी नोकरी व शेतीची जोड घालत पावसावर अवलंबून असलेल्या माळरान शेतीचे नंदनवन केल्याचे आढळून आले . यावेळी कृषिकन्या प्रीतम शिंगाडे हिने येथील पावसावर अवलंबून असलेल्या माळरान शेतीमध्ये वर्षाकाठी जवळपास पन्नास लाख रुपयांचे उत्पादन काढले ची माहिती घेतली असता या गावाला न कुठला कॅनल नको हे जवळपास धरण तरीदेखील हिम्मत करून फक्त एका बोरवेल वर १०० अंब्याची झाडे लावली व १५० रोपे लिंबूनी लावली. यामध्ये अंतर पिके कांदा, भेंडी, कोथिंबीर, उडीद मुग यासारखी नगदी पिके घेतली यामध्ये कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होवू वर्षाकाठी ५० लाखापर्यंत चे उत्पन्न होत असल्याचे सांगितले. यासाठी कृषी महाविद्यालयाचे शिक्षकांचे मोलाचे योगदान मिळाले.

COMMENTS