Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

Homeशहरंअहमदनगर

Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

https://youtu.be/gid8MwgD8jw अहमदनगर  जिल्ह्याला  वरदान ठरलेले भंडारदरा धरण आज रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे.11 टी एम सी क्षमतेचे &

Z.P निवडणुकांची तारीख झालीय जाहीर, मात्र लक्ष लागलंय सरकार आणि विरोधी पक्षाकडे
मुख्य बाजार नेप्तीला हलवण्याचा आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव – किरण काळे
हिवरगाव टोल नाक्यावर संगमनेरकरांचे रास्ता रोको

अहमदनगर  जिल्ह्याला  वरदान ठरलेले भंडारदरा धरण आज रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे.11 टी एम सी क्षमतेचे  भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यमानामुळे आज सकाळी ११ वा. धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के  भरला आहे .पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्याद्वारे २४३६ क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे ८२० क्युसेक्स असा एकुण – ३२५६ क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदी पात्रात  सोडण्यात आला आहे.
दोन तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात  नवीन पाण्याची आवक सुरू आहे. काल दिवस भराच्या 12 तासात धरणात 236 दलघफु पाण्याची आवक झाली, काल सायंकाळी पाणी साठा 10 हजार 559 दलघफु झाला होता. धरण 95.65 टक्के भरले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी भंडारदरा धरण 100 टक्के भरले.

COMMENTS