परभणी बसस्थानकावरील सुविधांची आ.राहुल पाटील यांच्याकडून पाहणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी बसस्थानकावरील सुविधांची आ.राहुल पाटील यांच्याकडून पाहणी

परभणी:-  येथील नव्या बसपोर्टचे काम सुरू असून, या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपातील बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणी सुविधां

अहमदनगर जिल्हा कामगार संघटना राबविणार दत्तक योजना
बाल सुधारगृहातील अल्पवयीन मुलावर अत्याचार
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंदीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

परभणी:- 

येथील नव्या बसपोर्टचे काम सुरू असून, या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपातील बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या बाबत अनेक तक्रारी आल्याने शनिवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सुविधा तात्काळ पुरवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नवीन बसपोर्टच्या बांधकामाची देखील त्यांनी पाहणी केली.     

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसामुळे परभणी बस स्थानक तथा बस स्थानकाबाहेर साचलेल्या पाण्याची आ. पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली. तसेच परभणी येथे होऊ घातलेल्या नूतन बसस्थानकाच्या इमारतीतच्या बांधकामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.    महत्त्वाचे म्हणजे बसस्थानक परिसरात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यात यावा,  नागरिकांना होणार्‍या गैरसोयी दूर कराव्यात, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.   यावेळी त्यांच्या समवेत मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, व्यवस्थापक दयानंद पाटील, राष्ट्रीय महामार्ग मार्गाचे अभियंता रुद्रवार, मनपा अभियंता वसीम खान, शिवसेनेचे उपशहरप्रमुख संभानाथ काळे, मारुती तिथे, नगरसेवक प्रशांत ठाकूर, विभाग प्रमुख उद्धव मोहिते, ऋषिकेश सावंत यांच्यासह पदाधिकारी ॲटोरिक्षा चालक तथा प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केकरजवळया जवळ वाहनाच्या धडकेत दोन जागीच ठार; दोन गंभीर परभणी:पाथरी ते नसिंह पोखर्णी या मार्गावर केकरजवळा शिवारात रविवारी  पहाटे एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या तर दोन व्यक्ती झाल्या आहेत. 

पाथरीकडे जाणारे हे वाहन रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या ग्रामस्थांना धडक देवून सुसाट वेगाने पुढे निघून गेले, त्यामुळे त्या वाहनाचा पत्ता लागला नाही. या अपघातात दोन व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडल्या दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.   पहाटेच्या सुमारास पोलिस पाटील उत्तमराव लाडाणे, आत्माराम लाडाणे, नंदकिशोर लाडाणे, राधाकिशन लाडाणे पाथरी पोखर्णी रोडवर मॉर्निंग वॉक करत असताना पोखर्णीहुन पाथरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने या चारही जणाना धडक दिली. यात उत्तमराव लाडाणे व आत्माराम लाडाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदकिशोर लाडाणे व राधाकिशन लाडाणे यांच्यावर परभणी येथे उपचार चालू आहेत.मानवत पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्या वाहनाचा पोलिसांनी शोध सूरू केला आहे.

COMMENTS