उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या अडचणी वाढणार… शिवसेनाही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या अडचणी वाढणार… शिवसेनाही उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

प्रतिनिधी : मुंबईमहाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शिवसेना आता गोवा आणि उत्तरप्रदेशातही मविआचा

महिला सबलीकरण हा नव्या युगाचा जयघोष ः प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड
कृषी पंपाच्या वीज तोडणीस स्थगिती ; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा
सत्ता नसतानाही माजी आ.प्रदीप नाईक जाणून घेत आहेत जनतेच्या समस्या

प्रतिनिधी : मुंबई
महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शिवसेना आता गोवा आणि उत्तरप्रदेशातही मविआचा प्रयोग करणार आहे.

गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू केले आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. तसेच गोव्यात २०-२१ तर उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ८०-१०० जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार तर उत्तरप्रदेशातही ८० ते १०० जागा लढवू, तसेच गोव्यात माविआसारखा प्रयोग करू शकतो.

उत्तरप्रदेशातही काही शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यूपीतही माविआसारखा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तरप्रदेशात युती झाली नाही, तर आम्ही एकटे लढू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपाने गुजरातचा मुख्यमंत्री बदलला आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री बदलणे हा त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले.

यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजपाची स्थिती बरी नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपाला काठावरच बहुमत मिळाले.

बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा खेचून आणल्या आणि तसेच गुजरातमध्ये झाले. पक्ष मजबूत करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर बोलणे योग्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

COMMENTS