समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

Homeताज्या बातम्या

समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणकोपरगाव प्रतिनिधी - समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच निसर्गाच्या अनुषंगाने नवनवीन

राष्ट्रवादीचा सरपंच चंदन तस्करांच्या टोळीत सक्रिय… पोलिसांची कारवाई
काजलगुरुंच्या जीवनपट चित्रपटाद्वारे उलगडणार l LokNews24
पोलीस आयुक्तालयासमोर तरूणानं घेतलं पेटवून l DAINIK LOKMNTHAN

समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण
कोपरगाव प्रतिनिधी – समता इंटरनॅशनल स्कूल नेहमीच निसर्गाच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम राबवत असते. निसर्गाच्या सानिध्यात राहून समता स्कूल विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षणाची प्रेरणा देत आली आहे.तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव देखील सामाजिक, शैक्षणिक दृष्टीने अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते त्यातीलच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष श्री रामदास थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समतातील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रसंगी गणेश मूर्ती प्रशिक्षक अनिकेत जाधव,मयूर जाधव आणि साक्षी सोनवणे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेश मूर्ती पाहून प्रशिक्षकांनी समताच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली कला दिवसेंदिवस वाढणारी असून कलेचा जीवनात वापर करावा.असे मार्गदर्शन करताना सांगितले. प्रशिक्षणात बनविलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त घरी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी विद्यार्थी घेऊन गेले.
सदर प्रशिक्षण शिबीराचे समता स्कूलच्या फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. लाईव्ह प्रक्षेपणामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गणेश मूर्ती पाहून समस्त पालक वर्गाचा आनंद गगनात मावत नव्हता.त्यामुळे पालक वर्गाकडून स्कूलचे व्यवस्थापन मंडळ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आदींचे मनापासून आभार मानले.
सदर प्रशिक्षणाला समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक श्री संदीप कोयटे ,शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन,उपप्राचार्य श्री समीर अत्तार, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.उपस्थितांचे आभार उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी मानले.

COMMENTS