Homeताज्या बातम्याबीड

अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजनभाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत भक्तिमय वातावरणात श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हनु

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार : मुख्यमंत्री फडणवीस
रोहमारे महाविद्यालयाच्या प्राप्ती बुधवंतचे वक्तृत्व स्पर्धेत यश
विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित



अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत भक्तिमय वातावरणात श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान नगर येथील श्री कृष्ण मंदिर परिसरात हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडत असून परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
या भागवत कथेसाठी उत्तर प्रदेशातील ह.भ.प. सर्वेश शास्त्री (नैमिषारण्य धाम) हे कथा प्रवक्ते म्हणून उपस्थित आहेत. त्यांच्या ओजस्वी आणि रसपूर्ण वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे सखोल निरूपण करण्यात येत आहे. कथा दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. 17 मे 2026 रोजी या ज्ञानयज्ञास प्रारंभ झाला असून शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी समारोप होणार आहे. समारोप दिनी दुपारी 2 ते 5 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दुसरे पुष्प म्हणून साजरा होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सौ. रंजना बालासाहेब कुर्‍हे, किरणजी उपाडे, ड. गिरीश नरवणे व अजय बालासाहेब कुर्‍हे यांनी केले आहे. श्री कृष्ण मंदिर, हनुमान नगर, परळी वैजनाथ (जि. बीड) येथे सुरू असलेल्या या भागवत महाकथेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS