Homeव्हिडीओ

राजस्थान पोलिसांचा सायकलवर गस्त घालतानाचा व्हिडिओ व्हायरल; “चोरांना सायकलने पकडणार का?” असं म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

https://youtu.be/bCiMjqnf-iQ राजस्थान पोलिस कर्मचाऱ्यांचा रात्रीच्या वेळी व्यस्त बाजारपेठेत सायकलवर गस्त घालतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ loknews24
खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | LOKNews24
तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१५ जून २०२२ | LOKNews24

राजस्थान पोलिस कर्मचाऱ्यांचा रात्रीच्या वेळी व्यस्त बाजारपेठेत सायकलवर गस्त घालतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खाकी गणवेषातील हे पोलिस कर्मचारी बाजारातील दुकाने, ऑटोरिक्षा आणि गर्दीतून सायकल चालवत जाताना दिसत आहेत. पोलिसांची ही अनोखी गस्त फिटनेस वाढवण्यासाठी, खर्च बचतीसाठी की एखाद्या विशेष मोहिमेचा भाग आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर आणि विरोधकांकडून यावरून राजस्थान सरकारची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. “पोलीस चोर आणि दरोडेखोरांचा पाठलाग सायकलवरून करणार का?” आणि “सरकारची नेमकी प्राधान्ये काय आहेत?” असे खोचक सवाल नेटकरी विचारत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी याला पोलिस दलातील संसाधनांच्या कमतरतेचा पुरावा म्हटले आहे. राजस्थान पोलिसांकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या व्हिडिओमुळे राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि पोलिसांच्या आधुनिकतेवर एक नवी चर्चा रंगली आहे.

COMMENTS