Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रियांच्या सुरक्षेबाबतची स्थिती विदारक : प्रा. मिसाळ

श्रीगोंदा : छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, श्रीगोंदा यांच्या वतीने यंदाची छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, “शंभू शौर्यगाथा” पुस्तक वाटप तसेच “शंभूराजे शौर्य” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.१४ मे रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात प्रसिद्ध वक्ते व “शंभू शौर्यगाथा” पुस्तकाचे लेखक महेंद्र मिसाळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या प्रभावी आणि ओजस्वी भाषणातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष, पराक्रम, त्याग आणि बलिदान यांचे जिवंत चित्र उभे केले.शंभूराजांवर झालेल्या अमानुष छळाचे वर्णन करताना उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. इतिहासातील या प्रेरणादायी अध्यायासोबतच प्रा. मिसाळ यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही परखड भाष्य केले. जातीवाद, महिला सुरक्षा, युवकांमधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण, भ्रष्टाचार तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.“स्वराज्यात स्त्रिया सुरक्षित होत्या; मात्र आजच्या काळात लहान मुलीही सुरक्षित नाहीत, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त करत समाजाने छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.व्याख्यानाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “जय शंभूराजे”, “जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. टाळ्यांच्या कडकडाटात प्रा. मिसाळ यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अशोकराव काळेंच्या वाढदिवसनिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात
जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

COMMENTS