Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कुंभार कारागिरांना आता नऊ महिने उचलता येणार मातीमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय ; वीटभट्टी व्यवसायासाठी थेट पाच वर्षांसाठी सलग परवाना

मुंबई : कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित 10 सदस्यांनी घेतली शपथ
बाळासाहेब लढवये तर, उद्धव ठाकरे रडोबा
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’


मुंबई : कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
मंत्रालयातील दालनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. महसूलमंत्र्यांनी या समाजाच्या नऊ प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली. या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी जुन्या अध्यादेशांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामुळे कुंभार बांधवांना व्यवसायात येणार्‍या प्रशासकीय अडचणी आता कायमच्या दूर होणार आहेत.
कुंभार व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी पारंपरिक कामांची माहिती घेऊन विशेष व्यावसायिक क्लस्टर तयार केले जाणार आहेत. या क्लस्टरसाठी 5 वर्षांच्या करारावर जागा उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय, वीटभट्टी व्यवसायासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची कटकट संपवून आता थेट 5 वर्षांसाठी सलग परवानगी दिली जाईल. हे परवाने पारदर्शकतेसाठी डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले जातील. कुंभार समाजाला व्यवसायासाठी विशेष प्रमाणपत्र देऊन वीज दरात सवलत देण्याबाबतही चर्चा झाली. कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर येथील वीज केंद्रांतून मोफत फ्लाय (राख) उपलब्ध करून दिली जाईल, तर नाशिक, भुसावळ आणि परळी केंद्रांत कुंभार समाजासाठी 20 टक्के राख आरक्षित असेल. तसेच संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी सर्व महसूल व वन विभागाच्या कार्यालयांत साजरी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
नऊ महिने माती उत्खनन, 700 ब्रासची मर्यादा

COMMENTS