भर पावसात जयंत पाटलांची सभा : लोकांना शरद पवारांची आठवण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर पावसात जयंत पाटलांची सभा : लोकांना शरद पवारांची आठवण

सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे.

15 वर्षांच्या मुलाने केला 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
‘माफी मांगो राज ठाकरे…’
वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

पंढरपूर / प्रतिनिधी : सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचं रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. आज (11 मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षही गेले नसते. मात्र, भर पावसात जयंत पाटील यांनी सभा दणाणून सोडली. त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातार्‍यातील सभेची आठवण झाली. जयंत पाटलांच्या या सभेच्या निमित्ताने पवारांनी सातार्‍यातील सभेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे लोक सांगतायत. 

पाऊस आला अन् पाटलांनी सभा दणाणून सोडली.

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सन 2019 मध्ये शरद पवार यांनी भर पावसात सातार्‍यात सभा घेतली होती. अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असताना तसूभरही विचलीत न होता पवारांनी ही सभा दाणाणून सोडली होती. 80 वर्षीय शरद पवार यांची ही सभा ऐतिसहासिक असल्याचे अजूनही सांगितले जाते. त्यांच्या याच सभेमुळे बेडे नेते सोडून गेले असूनही राष्ट्रवादीने सन 2019 च्या विधानसभेत मोठी कामगिरी करुन दाखवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनांतनर पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमीर जयंत पाटलांनीही भर पावसात जंगी सभा घेतली आहे. जयंत पाटील सभेत भाषण करत असताना अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. विजाही कडाडत होत्या. मात्र, डोक्यावर पावसाच्या धारा पडताना जयंत पाटीलसुद्धा तिळमात्र विचलीत झाले नाहीत. त्यांनी सभेत उभं राहत आपलं भाषण पूर्ण केलं. त्यांनी सभा दणाणून सोडली.

लोकांना शरद पवारांची आठवण

जयंत पाटील यांची आजची भर पावसातली सभा पाहून अनेकांना शरद पवारांच्या यन 2019 मधील सातार्‍यातील सभेची आठवण झाली आहे. भर सभेत पाऊस येणे म्हणजे पवारांच्या सातार्‍याच्या सभेची पुनरावृत्ती असून हा तर शुभसंकेत आहे, असे अनेकांनी म्हटलंय. तर काहींनी हे तर शरद पवार यांच्या पावलांवर पाऊल ठेवणं असून जलसंपदा मंत्र्याच्या अंगावर पावसाची वृष्टी होतेय असं या सभेचं वर्णन केलंय.

सभेत जयंत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भगिरथ भालके यांचाच विजय होणार, असा विश्‍वास व्यक्त केला. मंगळवेढ्याला जास्तीत-जास्त पाणी मिळावे, यासाठी भारत भालके सन 2009 पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी भूमिका घेतली होती. योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले. मात्र, ते कधीच फिरकले नाहीत. परंतू भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

COMMENTS