आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

प्रतिनिधी : शिरुरशिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पवारांसाठी काम कर

शाश्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
अभिनेता किथ-रोशेल होणार आई-बाबा
माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते – खा. भावना गवळी

प्रतिनिधी : शिरुर
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.संजय राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी? असा सवालही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता.

त्यावरही राऊत यांनी पलटवार केला आहे. कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते. आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांचे संबंध आहेत. ते कायम राहतील.

शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडणार पडत नाही आणि पडणारही नाही, असेही राऊत म्हणाले .

मी राज्यपालांवर टीका केली नाही. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं राऊत म्हणाले.

राऊतांच्या दंडात ताकद आहे का? या चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो, असा इशारा त्यांनी दिला.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका नाही हे सांगण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे मला माहीत नाही.

पण कोरोना केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता . यावरही राऊत यांनी भाष्य केले .

COMMENTS