कोपरगाव पोलिसांचा गोळीबार.. एक जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव पोलिसांचा गोळीबार.. एक जखमी

कोपरगाव / ता,प्रतिनिधी कोपरगाव शहरातील बाजार तळ येथील मैदानावर शुक्रवार दुपारी चार वाजता पोलिसांचा मोठा फौज फाटा हजर झाला पाठोपाठ अग्निशमन दल व रु

बस स्टँडमध्ये घुसला बंदूकधारी पोलिसांचा ताफा…
मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती असावी ः प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

कोपरगाव / ता,प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील बाजार तळ येथील मैदानावर शुक्रवार दुपारी चार वाजता पोलिसांचा मोठा फौज फाटा हजर झाला पाठोपाठ अग्निशमन दल व रुग्णवाहिकाही हजर झाली बघ्यांची गर्दी जमली काय झाले नागरिकांना समजेना, थोड्याच वेळात समोर जमलेल्या जमावाने तुफान घोषणाबाजी सुरू केली, हमारी मांगे पुरी करो म्हणत पोलिसांवर दगडफेक सुरू करण्यात आली

त्यानंतर पोलिसांनी या जमावावर पाण्याचा मारा केला त्यातही हा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या व त्यानंतर गोळीबार केला, त्यात आंदोलन करणाऱ्या जमावातील एकाला गोळी लागली त्याला रुग्णवाहिकेत टाकून हॉस्पिटल कडे नेण्यात आले. त्यानंतर जमावाला पांगविण्यात पोलिसांना यश आले. हा सर्व प्रकार खरा नसून पोलिसांची दंगा नियंत्रण तालीम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बघ्यांनी निःश्वास सोडला.

पोलिसांची दंगा नियंत्रणाची उजळणी व्हावी यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने ही रंगीत तालीम घेण्यात आली होती. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत नागरे आदींसह पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी अधिक माहिती देताना सांगितले की

अचानक काही घटना घडतात त्यावेळेस पोलिसांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा विसर पडू नये वेळेवर प्रत्येकाने आपली पोजीशन घेतली पाहीजे उद्भवलेली परिस्थिती ,दंगल,गर्दी जमाव असेल त्याला कशा पध्दतीने नियंत्रणात केले पाहिजे त्यासाठी काही गाईडलाईन असतात दंगल नियंञनात करताना ब-याचदा चुका घडतात व लोकांना नियंञनात करताना काही वेळा पोलिस दला मध्ये टेक्निकल नॉलेज राहत नाही त्यांच्या कडे असलेले ज्ञान नेहमीनेहमी उजळणी होणे अपेक्षित आहे त्या अनुशंगाने उद्भवलेल्या घटनेला पोलिस तातडीने कशा पध्दतीने सामना करु शकतात घडलेली घटना ताबडतोब कशी रोखू शकतात अशा प्रकारे प्रत्येकाची उजळणी होणे अपेक्षित असते व कमी वेळेत जास्त काम कसे कसे करता येईल ही संकल्पना आहे त्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही अशा प्रकारे रंगीत तालीम घेत असतो असे श्री देसले व श्री जाधव यांनी सांगितले .

COMMENTS