वेब टीम : काबुलअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर सुरुवातीला भारत पाकिस्तान संबंधात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगणार्या तालिबानचे मनसुबे आता उघड होऊ ल
वेब टीम : काबुल
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर सुरुवातीला भारत पाकिस्तान संबंधात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगणार्या तालिबानचे मनसुबे आता उघड होऊ लागले आहेत. तालिबानने पहिल्यांदाच काश्मीरप्रश्नात तोंड खुपसण्याची मुजोरी केली.
माध्यमांशी संवाद साधताना तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने ’तालिबानला काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा अधिकार’ असल्याचे वक्तव्य केले.
पाकिस्तानकडून तालिबानचा वापर फुटीरतावादी अजेंड्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच काश्मीरमध्ये इस्लामी भावना भडकावण्यासाठी केला जाण्याची शक्यता यानंतर व्यक्त केली जात आहे. डिजिटल पद्धतीने माध्यमांशी संवाद साधताना सुहैल शाहीन याने हे वादग्रस्त वक्तव्य केले.
’मुस्लिम म्हणून तालिबानला भारतातील काश्मीमध्ये किंवा अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उंचावण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू आणि मुस्लिम हे तुमचेच लोक आहेत, तुमच्याच देशाचे नागरिक आहेत. तुमच्या कायद्याप्रमाणे ते सर्व समान आहेत,’ असे शाहीन याने म्हटले आहे.
COMMENTS