मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असून, त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी अंमलबजावणी संचा
मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असून, त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी, आणि त्यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. यासोबतच सीबीआयने आपल्या एका अधिकार्याला देखील अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुरूवारी अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडी समन्स रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. तसेच दुसर्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी दिले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्याभोवतीचा ईडीचा फास घट्ट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे देशमुख यांना केव्हाही अटक होऊ शकते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आपल्याच अधिकार्याला अटक केली आहे. अभिषेक तिवारी असे त्या अधिकार्याचे नाव आहे.
29 ऑगस्ट रोजी अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा प्राथमिक अहवाल लीक झाल्याने त्यावरुन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या चौकशी अहवालात असे म्हटले होते की, अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही. यासंदर्भात क्लीनचीटच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयने हे सर्व प्रकरण फेटाळत चौकशी सुरु केली होती. याप्रकरणाच्या चौकशीअंती हे दिसून आले की, देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकार्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या लाच प्रकरणात समावेश असलेल्या सीबीआयच्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असंही सीबीआयने म्हटले होत. त्यानुसार, गुरूवारी सकाळी सीबीआयने अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे. अभिषेक तिवारी सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. अनिल देशमुख तपासाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्या वकिलाच्या संपर्कात होते. या प्रकरणीच अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही ताब्यात घेतलेले आहे. सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.
सीबीआय दिल्लीत करणार पुढील तपास
अभिषेक तिवारी आणि आनंद डागा या दोघांना कोर्टात हजर केले जाणार असून त्यांची पुढची चौकशी आणि तपास महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. याचा अर्थ अनिल देशमुखांच्या 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाबरोबरच हे लाचखोरी प्रकरणामुळे देशमुखांच्या अडचणी वाढणार आहे. आता वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याबाबतचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबई पोलिसांकडे मागितला आहे. मुंबई पोलीस आता नेमका कोणता रिपोर्ट अजित पवारांना सादर करतात, यावर महाविकास आघाडीची पुढची चाल अवलंबून आहे.
याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात हायकोर्टाच्या निर्देशानुसार सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. या चौकशीविरोधात अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला असल्यामुळे हे प्रकरण आता दुसर्या खंडपीठासमोर जाणार आहे.
COMMENTS