फिनिक्स पुरुष बचत गटाने निसर्गातील पक्ष्यांसाठी उभारले खाद्यपदार्थ घरटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फिनिक्स पुरुष बचत गटाने निसर्गातील पक्ष्यांसाठी उभारले खाद्यपदार्थ घरटे

कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा ; महावितरणचे आवाहन
Sangmaner : संगमनेर मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन l LokNews24
सुरेगावात विविध उपक्रमांनी मतदान जनजागृती

पाथर्डी (प्रतिनिधी)
 :मानव व निसर्ग यांचे अगदी जवळचे नातं आहे. प्राणी, पक्षी,झाडे, माणूस या सर्वाची एक अन्न साखळी तसेच जीवनसाखळी आहे.
मानवाचे झाडावर, पक्ष्यांवर देखील जीवन अवलंबून आहे.. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गातील पक्षी हा महत्त्वाचा घटक आहे. पक्षी बीजप्रसार, अन्नवहन, तसेच एकंदर मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सध्या  पाण्याचे  जाणवणारे दुर्भिक्ष्य,  पिकांवरील किटकनाशक फवारणी यामुळे अनेक पक्ष्यांच्या मृत्यू चेही प्रमाण वाढत आहे. पक्ष्यांच्या  अन्न व पाण्याची सोय व्हावी म्हणून पाथर्डी येथील फिनिक्स बचत गट यांनी पक्ष्यांसाठी  अन्न पदार्थ पात्र (घरटे) तयार केले. तसेच पाण्याची सोय व्हावी म्हणून टाकाऊ वस्तूंपासून म्हणजे पाणी बाॅटलपासून पाणी पिण्याचे पात्र तयार केले.पक्ष्यांसाठी अन्न  व पाण्याची सोय करून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. 
  पक्ष्यांसाठी खाद्यपदार्थ घरटे व पाण्याचे भांडे पाथर्डी परिसरातील डोंगरावर,जवळील गाव परिसरात बसविण्यात आले. वनदेव परिसर,गर्भगिरी डोंगर, धामणगाव टेकडीवर,वैदूवस्ती प्राथमिक शाळा, मढी परिसर आदी ठिकाणी हे सर्व खाद्यपदार्थ घरटे, पाणी भांडे विद्यार्थी व नागरिक यांच्या समवेत  बसविण्यात आले.
     या प्रसंगी फिनिक्स बचत गटाचे अध्यक्ष श्री महेश वाघमोडे  म्हणाले की,वनदेव टेकडी व धामणगाव परिसर हा पाथर्डी शहराच्या अगदी जवळपास आहे. शहरातील नागरिक,महिला,ज्येष्ठ सदस्य,विद्यार्थी हे फिरण्यासाठी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात येत असतात.त्यामुळे सजग नागरिक म्हणून तेही पक्ष्यांसाठी धान्य कधी पाणी बरोबर आणतील.जेणेकरून नागरिकांना या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मिळेल.अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी गटाचे कृतिशील सचिव ज्ञानेश्वर गायके, संदीप भागवत,संदीप धायतडक,सचिन शेरकर,सचिन काकडे,प्रशांत नजननितीन एकशिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले तर गटाचे मार्गदर्शक सदस्य तथा आदर्श शिक्षक श्री भाऊसाहेब गोरे यांनी आभार मानले.

COMMENTS