Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान

माहूर : भारवतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष माहूरच्या वतीने शहरातील बुद्धभूमी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
रामपुरीत आंबेडकर जयंती उत्सवाची जोरदार तयारी; जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची प्रमुख उपस्थिती

माहूर : भारवतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष माहूरच्या वतीने शहरातील बुद्धभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा उपक्रम आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडला.
तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या अभियानात शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे, अपिल बेलखोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने माहूर येथे बुद्धभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कुमरे गुरुजी, पत्रकार ईलियास बावाणी,  दत्तात्रय शेरेकर, आकाश कांबळे, निलेश तायडे, गौरव जयस्वाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS