काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून त्यांनी तेथील नागरिक इतर देशात आश्रयाला जातांना दिसून येत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये असलेले नागर
काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून त्यांनी तेथील नागरिक इतर देशात आश्रयाला जातांना दिसून येत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये असलेले नागरिक दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. तसेच तालिबान्यांकडून पत्रकारांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. तालिबानने लोकांना घाबरू नका असे आवाहन करत माध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याची हमी दिली होती. मात्र, हळूहळू तालिबानचे खरे रुप समोर येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका टीव्ही पत्रकाराला जबरदस्तीने तालिबानची स्तुती करण्यास सांगितले जात आहे. मसिह अलिनेजाद या एका महिला पत्रकाराने हा व्हिडिओ समोर आणला आहे. घाबरू नका! अफगाणिस्तानातील न्यूज अँकरचे हे शब्द होते. दोन सशस्त्र तालिबानी टीव्ही पत्रकाराच्या मागे स्टुडिओमध्ये उभे होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आता तालिबानच्या मुक्त माध्यमांच्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
COMMENTS