राज्यात तब्बल दीड लाख कोटींची तूट : अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात तब्बल दीड लाख कोटींची तूट : अजित पवार

पुणे/प्रतिनिधी : कोरोनाचे संकट त्यानंतर लागू केलेली टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था सावरत असतांना, वेळोवेळी रुग्णांनी संख्या पाहून लागू करण्यात येणार्‍या न

औसा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उपमुख्यमंत्री
एमपीएससीकडून भरणार 15 हजार 511 पदेे – अजित पवार l DAINIK LOKMNTHAN
सुक्ष्म आणि लहान, आता ते काय निधी देणार आहेत? l LokNews24

पुणे/प्रतिनिधी : कोरोनाचे संकट त्यानंतर लागू केलेली टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था सावरत असतांना, वेळोवेळी रुग्णांनी संख्या पाहून लागू करण्यात येणार्‍या निर्बंधामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या खणखणाट जाणवत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये दरवर्षी साडेचार लाख कोटी रुपये जमा होत असतात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून दीड लाख कोटींची तूट आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उभारण्यात येणार्‍या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राच्या उद्धाटना वेळी ते बारामतीमध्ये बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
राज्यात कोरोनामुळे तूट वाढत असून, विविध प्रकल्पांसाठी निधीची मोठया प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार वेगवेगळया प्रकल्पांसाठी योजना राबवून निधी देत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. पवार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये फलोत्पादन योजना राबवण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात हीच योजना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेली. त्याचा परिणाम म्हणजे राज्यासह देशात फळांच्या उत्पादनात वाढ झाली. बारमाही फळे उपलब्ध झाली. मात्र कृषीमुल्य साखळीच्या टप्प्यात 40 टक्के तर शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमध्ये अजुनही फळे, भाजीपाला यांचे 60 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात मॅग्नेट प्रकल्पाव्दारे महाराष्ट्रामध्ये सुमारे 1 हजार 100 कोटीची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हा पहिला प्रकल्प बारामतीमध्ये उभारण्यात आला आहे. तत्पूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले, देशातील फळे निर्यातीमध्ये राज्यातील शेतकजयांचा वाटा मोठा आहे. डाळींब, केळी , संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके आदींना जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. काढणीपश्‍चात शेतकजयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जागतिक बाजारपेठेतील चांगल्या दराचा फायदा येथील शेतकजयांना व्हावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यावेळी सहकार व पणन प्रधान सचिव अनुप कुमार, कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक दिपक शिंदे, सभापती समिती वसंत गावडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, सिएनजी सेंटर उभे करण्यात येत आहे. जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा उद्देश आहे. तसेच सुपे येथे देखील नव्याने बाजार समितीच्या अंतर्गत पेट्रोेलपंप उभारण्यात येत आहे. तर जळोची येथील जनावरे बाजार पुढील काळात तालुक्यातील झारगडवाडी येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी 25 एकर जारा घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्य सरकार इलेक्ट्रिक बस घेणार
इंधन टंचाईचे मोठे सावट एसटीवर पडत आहे. त्यामुळे राज्य सरकार डिझेलवर चालणार्‍या एसटी बस घेणार नाही. सध्या इंधन टंचाईचे मोठे संकट एसटीवर आहे. त्यासाठी सीएनजी चालणार्‍या इलेक्ट्रीक बस राज्य सरकार टप्प्याटप्प्याने घेणार आहे. एसटी महामंडळाकडे कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी पैैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाला कर्मचार्‍यांच्या पगारासाठी 500 कोटी रूपये दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

COMMENTS