ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीचे समन्स

Homeताज्या बातम्यादेश

ममता बॅनर्जींच्या भाच्याला ईडीचे समन्स

कोलकाता : कोळसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. अभिषेक बॅनर

नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा छळ प्रकरणी सहाय्यक प्राध्यापक निलंबित
मुंबईतल्या साकीनाका भागात भीषण आग
शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

कोलकाता : कोळसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बर मतदारसंघातील खासदार असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. ईडीने अभिषेक यांना सप्टेंबरमध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, तर त्यांची पत्नी रुजीराला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) असाच समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाशी जोडलेल्या काही इतरांनाही पुढील महिन्यात वेगवेगळ्या तारखांना हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहेत. (पीएमएलए) च्या फौजदारी कलमांखाली दाखल केलेला गुन्हा, ईडीने नोव्हेंबर, 2020 मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर दाखल केला होता, ज्यामध्ये आसनसोल आणि आसपासच्या राज्यातील कुनुस्टोरिया आणि काजोरा भागातल्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड खाणींशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कोळसा चोरीचा घोटाळा होता. स्थानिक राज्य संचालक अनुप माझी उर्फ लाला या प्रकरणात मुख्य संशयित असल्याचा आरोप आहे.या बेकायदेशीर व्यापारातून मिळालेल्या निधीचे अभिषेक बॅनर्जी लाभार्थी असल्याचा दावा ईडीने यापूर्वी केला होता. दरम्यान भाच्याला ईडीचे समन्स आल्यामुळे ममता बॅनर्जी कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. याप्रकरणी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर अधिकाराच्या दुरुपयोगाचा आरोप केला. निवडणुकीत थेट जिंकू न शकल्यामुळे तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS