गांधार भूमीतील अशांततेचा वणवा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गांधार भूमीतील अशांततेचा वणवा

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणार नसल्याचे तालिबान्यांनी स्पष्ट केले होते. मात्र काही दिवस उलटत नाही, तोच

राष्ट्रवादी नेमकी कुणाची ?
महाविकास आघाडी बिघाडीच्या दिशेने…
आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे आणि उपाय योजना

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणार नसल्याचे तालिबान्यांनी स्पष्ट केले होते. मात्र काही दिवस उलटत नाही, तोच गांधारच्या भूमीवर दहशवादी हल्ले सुरू झालेत. इसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या तीन स्फोटात तब्बल 170 हून अधिक नागरिक, सैनिक ठार झाले आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या नंदनवनात शांततेच्या बाबी फोल ठरतांना दिसून येत आहे. तालिबान्यांवर नियंत्रण ठेवणारे कुणी उरले नाही, त्यामुळे त्यांचा दहशतवाद वाढत जाणार यात शंका नाही. काबूल विमानतळाबाहेर बुधवारी आयएसने आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. या हल्यातील मृतांची संख्या 170 झाली आहे. यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांसह 2 ब्रिटनच्या नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात 1276 नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ ( इसिस-के) ही मध्य आशियातील इस्लामिक स्टेटची दहशतवादी संघटनेने घेतली हेती. याची गंभीर दखल बायडेन सरकारने घेतली. अमेरिकेसारख्या महासत्तेने देखील या युद्धातून काढता पाय घेतल्यामुळे तालिबान्यांना वेसण घालणारे कुणी उरले नाही. त्यामुळे तालिबानी भविष्यात अजूनही वरचढ ठरू शकतात. त्यातच तालिबान्यांना चीन आणि रशिया या देशांनी पाठिंबा देण्याची भाषा केल्यामुळे, या देशांकडून जर तालिबान्यांना रसद मिळत गेली तर, तालिबान्यांच्या दहशतवादी कृत्यांना आळा घालणे कठीण जाणार यात शंका नाही. काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणार्‍या इसिस या दहशतवादी संघटनेवर अमेरिकेने पलटवार केला आहे. काबूलमध्ये ‘इसिस’चे दहशतवादी असणार्‍या नांगरहार प्रांतात अमेरिकेने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांन सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या नागरिकांनी काबूल विमानतळ तात्काळ सोडावे, असे आवाहन बायडेन सरकारने केले आहे. मात्र बायडेन यांची भूमिका बर्‍याचअंशी संशयास्पद आहे. कारण बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर शनिवारी अमेरिकेने दहशतवादी तळावर केलेले ड्रोन हल्ले यामुळे अमेरिका दहशतवादी कारवायांना रोखण्यापासून पळ काढतांना दिसून येत आहे. याचे दूरगामी परिणाम दिसून येतील.
तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे एक अनिश्‍चित स्वरूपाची शस्त्रसंधी आपल्याला पाहायला मिळाली तरी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय समूह कशा प्रकारे स्थिरता आणू शकेल, हे स्पष्ट झालेले नाही. ऑगस्टच्या अखेरपर्यंत अमेरिका आपले सैन्य माघारी घेणार आहेत. जर अमेरिकेने आपले सैन्य 31 ऑगस्पर्यंत परत बोलावले नाही, तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकीच तालिबान्यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा अपवाद वगळता कोणताही एखादा शक्तीशाली देश किंवा देशांचा शक्तिशाली गट त्यात उडी घेण्यास तयार होईल, हे स्पष्ट नाही. स्थिरता आणि बहुजातीय अफगाणिस्तान पाहणे भारताच्या हिताचे असले तरी, अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानला जो भौगोलिक सानिध्याचा आनंद मिळतोय, तो मिळणार नाही. ही एक महत्वपूर्ण अशी मर्यादा आहे, जी भारताच्या अर्थपूर्ण कृतीला रोखणारी असेल. अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मिळालेले यश पाहता आता पाकिस्तान काश्मीरमध्ये आपले दहशतवादाचे जाळे पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न करणार का, याकडे लक्ष ठेवावे लागेल. अशा प्रकारच्या कारवाईसाठी गेल्या काही वर्षांत भारताने दिलेल्या कठोर प्रत्युत्तरावरून हे दिसून येते की, विस्तीर्ण भूप्रदेशात अधिक अस्थिरता बघायला मिळू शकते. अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणण्यात चीनची काय भूमिका असेल, याबाबत अनेकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिका आणि रशिया जिथे सपशेल अपयशी ठरले, तिथे आर्थिक विकास आणि संसाधने यावर चीनचे लक्ष वेधले जाऊ शकते का? चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या विस्तारात चीनला रस असूनही, चीनने अतिशय सावध भूमिका घेतली आहे. चीन ‘वेट अँड वॉच’चा दृष्टिकोन अवलंबू शकतो. तसेच अफगाणिस्तानात हिंसाचार सुरू असून, त्यात चीन उडी घेणार नाही, अशी शक्यता आहे. शिनजियांगवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन चीन तालिबानसंबंधी काही ठोस पाऊल उचलण्यासाठी कोणतीही कृती करणार नसल्याचे दिसत आहे. शेजारील अनेक देशांनी वेट अ‍ॅड वॉचची भूमिका घेतल्यामुळे तालिबान्यांचा दहशतवाद वाढणार असून, भविष्यात तालिबान्यांना कोण वेसण घालेल हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.

COMMENTS