शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

बीड : शेअर मार्केटमध्ये तुला पैसे कमवून देतो, असे म्हणत एका भामट्याने युवकाकडून फोन पेवर पैसे मागवून घेतले. त्यानंतर तुझे शेअर्स विकले असून तुला मोठा

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली सद्भावना दिवस शपथ 
पुण्यात आढळला पोलिस अधिकार्‍याचा मृतदेह

बीड : शेअर मार्केटमध्ये तुला पैसे कमवून देतो, असे म्हणत एका भामट्याने युवकाकडून फोन पेवर पैसे मागवून घेतले. त्यानंतर तुझे शेअर्स विकले असून तुला मोठा फायदा होणार आहे, त्यासाठी टॅक्स भरावा लागेल, असे म्हणून युवकाकडून वेळोवेळी पैसे उकळले. एकूण १ लाख ३५ हजाराची फसवणूक केली. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार दिली आहे. कपाळे (वय २०, व्यवसाय शिक्षण, रा. एकता नगर नाळवंडी रोड पेठ बीड) या युवकाने पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रारी दिली आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निगरीक्षक विश्वास पाटील है करत असून त्यांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला आहे.

COMMENTS