अनियमित कोळसा पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती संकटात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनियमित कोळसा पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती संकटात

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या माध्यमातून अनियमित कोळसा पुरवठा होत आहे.

सुशांतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात | Filmi Masala | LokNews24
नगर-आष्टी रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी
‘पीपल्स’मुळे अनेक पिढ्या शिक्षित आणि स्वालंबी राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडच्या माध्यमातून अनियमित कोळसा पुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात वीज निर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या  औष्णिक वीज केंद्राला आवश्यकतेनुसार नियमित कोळसा पुरवठा करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसामंत्री आणि वेकोलिचे सीएमडी मनोजकुमार यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता 2920 मेगावॉट इतकी आहे. या वीज निर्मिती केंद्राला वीज निर्मितीसाठी 50 हजार टन कोळशाची आवश्यकता आहे; मात्र सद्यःस्थितीत युटीएस, रोपवे, रोड ट्रान्स्पोर्ट या माध्यमातून भटाळी, दुर्गापूर, पद्मापूर येथील खाणींच्या माध्यमातून 12 हजार टन कोळसा नियमित उपलब्ध होत आहे; मात्र कोळशाची रोजची मागणी 50 हजार टन असल्यामुळे एनबॉक्स तसेच डीओबीआरच्या माध्यमातून 35 हजार टन कोळसा अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेकोलिच्या माध्यमातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला नियमित कोळसा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. भविष्यात याचा विपरीत परिणाम वीज निर्मितीवर होऊ शकतो. ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत वीज निर्मिती ठप्प होण्याचे संकट यामुळे उद्भवू शकते.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे वेकोलिच्या खाण क्षेत्रात स्थापित असल्यामुळे वेकोलिच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार नियमित कोळसा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. 

COMMENTS