केज : तालुक्यातील आनंदगाव येथील येडेश्वरी साखर कारखाना लि. (युनिट क्र.1) चा सन 2025-26 चा गळीत हंगाम मिल पूजन करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झ

केज : तालुक्यातील आनंदगाव येथील येडेश्वरी साखर कारखाना लि. (युनिट क्र.1) चा सन 2025-26 चा गळीत हंगाम मिल पूजन करून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे गाळप येडेश्वरी कारखान्याने केले आहे.
कारखान्याकडून यंदाच्या हंगामात एकूण 9,22,116.379 मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून, ही कामगिरी कारखान्यासाठी निश्चितच अभिमानास्पद मानली जात आहे. संपूर्ण हंगामात ऊस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकरी आणि कारखाना प्रशासन यांच्यात चांगला समन्वय राखण्यात आला. तसेच कामगारांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि तांत्रिक व्यवस्थापन यामुळे गळीत प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. गळीत हंगामाच्या सांगता समारंभानिमित्त मिल पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी खा.बजरंग सोनवणे म्हणाले, ’येडेश्वरी साखर कारखान्याचा 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण होणे ही आनंदाची बाब आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या संयुक्त परिश्रमांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे. सर्व संबंधितांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. पुढील गळीत हंगाम अधिक यशस्वी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, या यशस्वी हंगामानिमित्त ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी व कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील हंगामासाठीही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS