Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार यादीतील त्रुटींमुळे मॅपिंगमध्ये अडथळे; फॉर्म 8 ऑनलाईन सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख आसिफुद्दीन यांचे निवेदन

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेदरम्यान अनेक जुन्या मतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.

बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा; कर्णकर्कश सायलेन्सरवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई
अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जागीच ठार; वनरक्षक महेश मेटे यांना कळविले-डॉ. गणेश ढवळे
तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेदरम्यान अनेक जुन्या मतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे सन 2002 पासून मतदार याद्यांमध्ये असतानाही नाव, आडनाव तसेच जन्मतारीख यामधील त्रुटींमुळे त्यांचे मॅपिंग होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बीड शहरातील लक्ष्मण नगर व शहिंशाह नगर येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते शेख आसिफुद्दीन गौस मोहिउद्दीन यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक मतदारांची नावे अनेक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये असतानाही नाव, आडनाव किंवा जन्मतारीख चुकीची नोंद झाल्यामुळे सध्याच्या मॅपिंग प्रक्रियेदरम्यान माहिती जुळत नाही. परिणामी संबंधित मतदारांचे मॅपिंग होत नसून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय मतदार यादीतील नाव, आडनाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी वापरला जाणारा फॉर्म क्रमांक 8 सध्या ऑनलाईन उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक दुरुस्त्या करता येत नसून मॅपिंग प्रक्रियेत आणखी अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, मॅपिंग प्रक्रियेची अंतिम तारीख 1 एप्रिल जवळ येत असल्याने या त्रुटी तातडीने दुरुस्त होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेख आसिफुद्दीन गौस मोहिउद्दीन यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, फॉर्म क्रमांक 8 ची ऑनलाईन सेवा तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच नाव, आडनाव व जन्मतारीख दुरुस्तीसाठी 1 एप्रिलपूर्वी विशेष मुदत देण्यात यावी किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून मॅपिंग प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराला अडचण येणार नाही.

COMMENTS