मुंबई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारव

मुंबई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अमोल मिटकरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला येथील रुग्णांकरता औषधे उपलब्ध करून देणे या विषयी प्रश्न उपस्थित केला होता.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवला जात आहे. शासकीय महाविद्यालयांमध्ये औषध खरेदीची ठराविक प्रक्रिया आहे. औषध खरेदीसाठी मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे ७० टक्के खरेदी वस्तू प्राधिकरणामार्फत केली जाते, तर उर्वरित ३० टक्के रक्कम संबंधित संस्थांकडून खर्च केली जाते. याशिवाय जिल्हा नियोजन समिती मधून प्राप्त होणाऱ्या निधीतूनही आवश्यक औषधांची खरेदी करण्यात येते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या बाबींची दखल घेतली जाईल. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी करून अहवाल घेतला जाईल. या रुग्णालयात सुमारे एमआरआय, सीटी स्कॅन तपासण्या केल्या जात असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच शासकीय रुग्णालयात पीपीपी तत्वावर नवीन यंत्रणा उभारण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS